1) |
सार्वजनिक गणेशोत्सव करिता संदर्भात नमूद महानगरपालिका व पोलीस प्रशासना कडील आदेशाच्या अधीन राहून मंडळास तात्पुरता मंडप उभारणे कामी दि. -- ते दि. -- या कालावधीसाठी परवानगी देण्यात येत असून सदरची परवानगी ही निश्चित केलेल्या ठिकाणीच वैध राहील. |
2) |
म. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र १७३ /२०१० मध्ये दिलेले आदेश तसेच महाराष्ट्र शासन, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखा
यांनी दिलेले आदेश काटेकोर पालन करणे मंडळास बंधनकारक राहील. |
3) |
सदर परवानगी पत्राची छायांकीत प्रत उत्सव कालावधीत मंडपाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. |
4) |
मंडळाच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवणे आवश्यक राहील. |
5) |
मंडळाच्या ठिकाणी लाईट तथा विद्युत रोषणाई बाबतच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी ही संबंधित मंडळाची राहील मंडप उभारणे ते काढणे पर्येंत कोणताही अपघात झाल्यास त्यास महापलिका जबाबदार राहणार नाही. |
6) |
मंडप उभारणेसाठी दिलेल्या मुदती नंतर मंडळाने मंडपाचा सर्व परिसर स्वच्छ करावा व मंडप उभारणी पूर्वी ज्या स्थितीत सदर जागा होती त्या स्थितीत १२ तासांच्या आत मोकळी करून देणे बंधनकारक राहील. |
7) |
मंडपामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता द्यावी. |
8) |
ध्वनी क्षेपकामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता संबधित मंडळाची राहील. |
9) |
सार्वजनिक उत्सवाकरिता आवश्यक विद्युत जोडणी महानगरपालिकेच्या रस्त्यावरील
कोणत्याही विद्युत पथदिपामधून घेता येणार नाही. असे आढळून आल्यास संबधित मंडळावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. |
10) |
मंडपात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक राहील. |
11) |
वरील पैकी कोणत्याही अटी/शर्ती चे उल्लंघन झाल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येऊन संबधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. |
12) |
देण्यात आलेली परवानगी कारण न देता रद्द करण्याचा अधिकार मालेगाव महानगरपालिकेचा राहील |
13) |
स्थापन होणाऱ्या श्रींची मूर्तीची
सर्वतोपरी सुरक्षीतता ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही मंडळ
पदाधिकारी यांची राहील. |
14) |
पोलीस प्रशासन, शहर वाहतूक शाखा यांनी दिलेली नाहरकत दाखल्यातील अटी/शर्तीची पालन करण्याची जबाबदारी मंडळाची राहील. |