या संकेतस्थळाचा उद्देश काय आहे?
मालेगाव महानगरपालिकेशी संबंधित विविध सेवा व माहिती उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
महानगरपालिका कार्यालयाची कामकाजाची वेळ कोणती आहे?
सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:३०.
हेल्पडेस्क संपर्क क्रमांक आणि वेळ कोणती आहे?
अधिकृत दूरध्वनी क्रमांक:
(02554) 234567, 220904, 231950, 297921, 9823339275
मुख्यालय (H.O.) : (02554) 231593
फिल्टर प्लांट (38 MLD) : (02554) 234646
हेल्पडेस्क क्रमांक:
1800-268-2901, 1800-833-2700
कामकाजाची वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:३०
मालमत्ता कराची ऑनलाइन भरपाई कशी करू शकतो?
आपण
malegaoncorporation.in या संकेतस्थळावर किंवा नागरीकार्यावली नागरिक ॲप वरून मालमत्ता कर भरू शकता. "Property Tax Collection" या पर्यायावर जाऊन मालमत्ता क्रमांक टाका आणि "PAY NOW" निवडा. पेमेंटसाठी नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI पर्याय उपलब्ध आहेत.
पेमेंट केल्यानंतर पावती कशी मिळेल?
पेमेंट पूर्ण झाल्यावर खात्री संदेश मोबाईलवर येईल व नोंदणीकृत ई-मेलवर पावती पाठविली जाईल.
कार्यालयातून पेमेंट केल्यास पावती ऑनलाइन पाहता येईल का?
होय, आपण नागरीकार्यावली नागरिक ॲप वरून पावती पाहू व डाउनलोड करू शकता.
मालमत्ता कराच्या नोंदीत नाव बदलण्यासाठी काय करावे लागेल?
आपल्याला जवळच्या मालेगाव महानगरपालिका कार्यालयात जावे लागेल.
ऑनलाइन पेमेंट करताना माझी मालमत्ता माहिती दिसत नाही.
कोणत्याही शंका किंवा सेवेसाठी मालेगाव महानगरपालिकेशी कसा संपर्क साधावा?
नगरकार्यावली नागरिक ॲप कसे डाउनलोड करावे?
आपण गुगल प्ले स्टोअर वरून नगरकार्यावली नागरिक ॲप डाउनलोड करू शकता.
तक्रार कशी नोंदवावी?
आपण संकेतस्थळावरील "Register Complaint" या मेनूमधून किंवा नागरीकार्यावली नागरिक ॲप वरून तक्रार नोंदवू शकता.