Welcome to : मालेगाव महानगरपालिका

  • कॉर्पोरेशनबद्दल

    • Home
    • कॉर्पोरेशनबद्दल

    कॉर्पोरेशनबद्दल

    *** AT GLANCE ***
     Area63.1862 Sq.Km.
     Population590998 (As per 2011 Census)
     Male Population300925 (50.92%)
     Female Population290073 (49.08%)
     Sex Ratio 
     Literacy 
     Number of Prabhag04
     Number of School80
     Number of Hospital + Dawahana03 Hospital + 05 Dawakhana
     Number of Health Center14
     Number of Sanitary Center15
     Number of Fire Station02
     Number of Dam + Filter plant2 Dam (Girna Dam + Talwade Balancing Tank) + 3 Filter Plant (38 MLD + 71 MLD + 30 MLD)

    मालेगाव एक स्वस्त शहर

    हातमाग ते पावरलुम
    (सायजिंग)

    १९३७ साली पहिला पावरलूम लावला गेला.तत्पूर्वी  हातमागावर साडीचे विणकाम होत होते. परंतु १९३७ मध्ये या व्यवसायाने खऱ्या अर्थाने या गावात एक नवे चैतन्य निर्माण केले.१९३७ ते १९४४-४५ या सात आठ वर्षांत जवळपास दीड हजार पावरलूम शहरात अस्तित्वात आले.या पावरलुमवर रंगीत साडिंची निर्मिती होत असे.

    मालेगावची साडी ही त्यावेळी उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होती.किमान खर्चात चांगल्या दर्जाची साडी मालेगावला तयार होऊन ती ग्राहकांसाठी बाजार पेठेत उपलब्ध होत असे.
    अडत पेढ्या
    साडी आडत व्यवसायात त्याकाळी ३० पेढ्या मालेगाव मध्ये कार्यरत होत्या. भागचंद दगडुसा, मोतीलाल विरचंद, शिवरतन जाजू यासारख्या नामवंत पेढ्या या शहरामध्ये गेली अनेक दशके प्रसिध्द आहेत.

    मालेगावी साड्या प्रामुख्याने खेडोपाडी जास्त जात.मालेगावला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे मनमाड. मनमाड पासून १६ मैलांवर असणारे रोटेगाव हे स्टेशन त्याकाळी निजाम हद्दीत येत असे. मालेगाव हे त्या काळच्या मुंबई  इलाख्यातील गाव. त्यावेळीं विदर्भ हा विरार नावाने ओळखला जाई या सर्व भागांतील खेड्यांमध्ये मालेगावी साडी आवडीनें वापरली जात असे.

    चांगल्यात चांगली साडी १३ रू. पर्यंत उपलब्ध होती. साधारण अठवड्याला वीस बावीस हजार साड्यांचे उत्पादन होऊन त्या वितरीत केल्या जात.
    गुजरी....
    त्याकाळी आडते उत्पादक मजूर या साऱ्यांमध्ये रोज होणाऱ्या व्यवसायाला गुजरी म्हटले जाई. ही गुजरी रोज दुपारी तीन वाजता शिंपाटी भागात भरत असे. पद्धत अशी की प्रत्यकाने आपपला तयार माल घेऊन यायचा.प्रत्यकाची माल ठेवण्याची जागा निश्चीत होती. त्या जागेवर माल आणायचा, आडत्याने योग्य भाव दिल्यास मालाची विक्री होऊन माल गोडाऊनमध्ये जाऊन दाखल व्हायचा शक्यतो व्यवहार रोख होऊन विषय संपविला जायचा.
    बँका....
    त्या काळी मालेगावी दोन बँका होत्या. शहरातील वस्र विक्री होणारे सर्वात मोठे ठिकाण कोठ्या जवळ 
     न्यू सिटीझन बँक तर वसंत वाडी जवळ बॉम्बे को ऑपरेटिव्ह बँक होती.

    ऑईल मील व जिनींग प्रेस....
    मालेगावात त्या काळी ऑईल मील हा दूसरा व्यवसाय तेजीत होता कृषीवर आधारीत उत्पन्नाचा तो एक भाग होता. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कापूस व शेंगा पिकवायच्या. एकीकडे त्याचे सुत तयार करायचे तर दुसरीकडे निघालेल्या शेंगदाण्यापासून तेल म्हणजे ऑईल मिल आणि जीनिंग प्रेसींग मील या दोन वाटा येथे सत्तर ऐंशी वर्षांपासून व्यापारासाठी उपलब्ध आहेत. त्याकाळी दहा ते बारा जिनींग व ऑईल मील उभारल्या होत्या.

    रावळगाव शुगर फॅक्टरी....
    एकीकडे पावरलुम जिनिंग व ऑईल मील रोजगारासाठी उपलब्ध असताना दुसरीकडे उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात ख्यातकिर्त असणारा रावळगाव साखर कारखाना तालुक्याच्या अर्थकारणाचा महत्वाचा भाग ठरला होता. रावळगावचे वैभव आजूबाजूच्या पाच पन्नास खेड्यांमध्ये नावाजले होते. तेथील बागायती शेती , दुधदुभते , दवाखाना, बाजारपेठ याविषयांचे प्रचंड आकर्षण ग्रामीण भागातील जनतेला होते.
    वाहतूक व्यवसाय...
    रावळगावची उत्पादीत होणारी साखर ट्रकने मुंबईला पाठवली जायची. उत्पादीत केलेला सर्वच माल ट्रकने वाहतूक केला जाऊ लागल्याने तेथे ट्रान्सपोर्टचा व्यवसायाचे ही चांगले मुळत धरले व एकेक करत शेकडो ट्रक मालेगावी खरेदी केल्या गेल्या. त्या शिवाय सराफ,सावकार, किराणा यासारखे व्यवसाय येथे पुर्वीपासून तेजीत होते. पॉवरलम व्यवसायात उत्पादक बहुतांशी मुस्लिम तर विक्रेते बहुतांशी हिंदू होते. त्याकाळी परक्या प्रांतात माल. विक्री करावयाचा असल्यास त्याची विशेष परवानगी घ्यावी लागत असे. अशा प्रकारची परवानगी मोतीलाल विरचंद आणि झुंबरलाल काकाणी या दोन पेढ्यांना मिळाल्याने या पेढ्यांच्या परवानगीवर उर्वरित पेढ्याही आपला माल पाठवीत असत.
    वकिल व डॉक्टर....
    १९४० च्या दशकात मालेगावी केवळ १५ ते २० वकील होते. कासार, मेहंदळे, चिंधडे सुतवणी ही काही त्यातील महत्वाची  नावे सांगता येतील. वैद्यकीय क्षेत्रात चार-पाच डॉक्टर्स कार्यरत होते. आर्किटे्ट, सी.ए. यासारखे व्यावसायिक मात्र औषधालाही नव्हते.

    मालेगाव हे हिंदू - मुस्लीम समाजाच्या गुंफणीवर आधारलेले महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणावे लागेल. किमान खर्चात कुटुंबाचे भरण पोषण होऊ शकणारे स्वस्त शहर म्हणून गेली शंभर वर्षे या गावाचा नावलौकीक आहे. आधुनिकतेचा स्पर्श भल्याही या गावाला प्राप्त झाला नसेल, परंतु येथे असणारा अस्सल गावरानपणा कुणालाही आवडेल आसाच आहे यात शंकाच नाही.